Air India Offer: सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात हवाई प्रवास करता यावा, यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या मासिक ‘पे-डे सेल’ची घोषणा केली आहे. या शानदार ऑफरमध्ये देशांतर्गत (डोमेस्टिक) आणि आंतरराष्ट्रीय (इंटरनॅशनल) विमानांची तिकीटं अत्यंत कमी किमतीत उपलब्ध झाली आहेत. ही विशेष ऑफर 1 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. डोमेस्टिक तिकीट फक्त 1,850 पासून – एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये देशांतर्गत मार्गांसाठी तिकीट दरांची सुरुवात फक्त 1,850 इतकी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हा दर 7,510 पासून सुरू होत आहे. ‘Lite Fares’ मध्ये अधिक सवलत विशेषतः, ‘लाईट फेअर्स’ (Lite Fares) बुक करणाऱ्या प्रवाशांना आणखी कमी दरात प्रवास करता येणार आहे. लाईट फेअर्समध्ये चेक-इन बॅगेजचा समावेश नसतो, ज्यामुळे तिकीट किंमत कमी होते. डोमेस्टिक लाईट फेअर्स ₹1,750 पासून तर आंतरराष्ट्रीय लाईट फेअर्स ₹5,915 पासून तिकीट दर आहेत. हे लाईट फेअर्स कमी सामान घेऊन प्रवास करणाऱ्या किंवा फक्त वीकेंड ट्रिपसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय फायदेशीर आहेत. अॅप बुकिंगवर शून्य सुविधा शुल्क – या सेल दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसच्या मोबाइल ॲपवरून तिकीट बुक केल्यास प्रवाशांना कोणतेही ‘सुविधा शुल्क’ (Convenience Fee) लागणार नाही. तसेच, वेबसाइटवर नेट बँकिंगद्वारे पेमेंट करणाऱ्यांनाही ही सूट मिळेल. लाईट फेअर्समध्ये तिकीट बुक करणाऱ्यांसाठी बॅगेजवरही आकर्षक ऑफर आहे. डोमेस्टिक (15 किलो बॅगेज) केवळ ₹1,500 मध्ये तर आंतरराष्ट्रीय (20 किलो बॅगेज) फक्त ₹2,500 मध्ये सुविधा उपलब्ध आहे. बिझनेस क्लास आणि लॉयल्टी सदस्यांना खास सूट – एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या Loyalty सदस्यांसाठी खास सवलती जाहीर केल्या आहेत. लॉयल्टी सदस्यांना बिझनेस क्लास बुकिंगवर 25% पर्यंत सूट दिली जात आहे. बिझनेस क्लासमध्ये आरामदायी बैठक व्यवस्था, मोफत जेवण, अतिरिक्त सामान आणि ‘एक्सप्रेस अहेड प्रायोरिटी सर्व्हिसेस’ (Xpress Ahead Priority Services) अशा सुविधा मिळतात. याशिवाय, लॉयल्टी सदस्यांना देशांतर्गत तिकीट बुकिंगवर ₹250 पर्यंत अतिरिक्त सूट दिली जाईल. इतर गटांसाठीही सवलती – एअरलाइन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबासाठीही विशेष सवलती प्रदान करत आहे, ज्यामुळे प्रत्येक वर्गातील प्रवाशांना दिलासा मिळेल. EMI आणि बाय नाऊ, पे लेटरची सुविधा – प्रवाशांना त्वरित पूर्ण पेमेंट करणे शक्य नसेल तर, एअरलाइनने ईएमआय (EMI) आणि ‘बाय नाऊ, पे लेटर’ (Buy Now, Pay Later) चे पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, व्हिसा (Visa) डेबिट आणि क्रेडिट कार्डांनी पेमेंट करणाऱ्यांना डोमेस्टिक उड्डाणांवर ₹250 आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर ₹600 ची फ्लॅट सूट मिळणार आहे.