करोनामुळे युपीएससी परीक्षा देता न आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी?

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका

नवी दिल्ली : देशातच नव्हे तर संपूर्ण जगावर करोनाचे अचानकपणे संकट आल्याने शैक्षणिक क्षेत्राला याचा फटका बसला आहे. त्यासोबतच केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घेणाऱ्या विविधा स्पर्धा परीक्षांवर देखील परिणाम झाला होता. करोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते त्यामुळे अनेक उमेदवारांना परीक्षेला मुकावे लागले होते. मात्र अशा उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. परीक्षा देता न आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

करोनामुळे युपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या परीक्षार्थींना पुन्हा संधी देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परीक्षार्थींना पुन्हा एक देण्यासंदर्भात युपीएससी आयोगाला निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. या याचिकेवर ए.एम. खानविलकर यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयाने केंद्र सरकार व युपीएससी आयोगाला सल्ला दिला. करोनामुळे नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले. यावेळी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली. करोनाचा फटका बसल्याने परीक्षा देता न आलेल्या परीक्षार्थींना पुन्हा एक संधी देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र आणि युपीएससीच्या विचाराधीन आहे, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.