“विरोधकांनी यावर राजकारण करु नये”; महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योतींचा इशारा

Maha Kumbh Stampede | प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर आज (बुधवार) मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले आहेत. दरम्यान, रात्री झालेल्या या चेंगराचेंगरीची अनेकजण जखमी झाले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सर्व 13 आखाड्यांनी आज होणारं अमृतस्नान रद्द केल्याची माहिती आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर साध्वी निरंजन ज्योती यांनी सरकारकडे या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी विरोधकांनी यावर राजकारण करु नये. या प्रकरणात आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणा समोर आलेला नाही. आतापर्यंत 5 कोटी लोकांनी सुरक्षितपणे स्नान केल्याचं साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती घेत मदत कार्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश दिले. Maha Kumbh Stampede |
#WATCH | #MahaKumbh2025 | Prayagraj, Uttar Pradesh: On the stampede-like situation in the Maha Kumbh area Sadhvi Niranjan Jyoti says, “This is a sad incident. Whatever happened was not right. Akhara Parishad has decided to cancel their Amrit Snan keeping in mind the public… pic.twitter.com/jtUJWwnhkB
— ANI (@ANI) January 29, 2025
या घटनेनंतर महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेला अमृत स्नान थांबवण्याचे आवाहन केले आहे. महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी यांना आखाड्यांचे अमृत स्नान सध्या तरी थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर हे अमृत स्नान थांबवण्यात आले आहे. Maha Kumbh Stampede |
महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत मोठ्या संख्येनं लोक जखमी
महाकुंभमेळ्यात दाखल झालेल्या भाविकांनी संगम घाटावरच अमृतस्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र मध्यरात्री 2 वाजता चेंगराचेंगर झाली ज्यात मोठ्या संख्येनं लोक जखमी झाले आहेत. यात 17 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. परंतु अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा:
महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी, 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता, शाही स्नान थांबवण्याचा निर्णय





