जुन्नरला होणारी शिवसृष्टी बारामतीला हलवण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहीन- आमदार बेनके
Updated On:

जुन्नर- जुन्नरला होणारी शिवसृष्टी बारामतीला हलवण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहीन आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आणि वडज धरणाच्या जवळ खासदार अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेनुसार भारतातील भव्य शिवसंस्कार सृष्टी उभी राहणार आहे. विरोधकांनी जनतेची दिशाभूल न करता गत पंचवार्षिक मध्ये शिवनेरी विकासासाठी किती निधी आणला हे सांगावे असा टोला आमदार अतुल बेनके यांनी लगावला.
मागील पंचवार्षिक मध्ये का शिवसृष्टी होऊ शकली नाही,पुणे ,पुरंदर येथे शिवसृष्टी होत असताना का विरोध दर्शविला नाही असा सवाल आमदार बेनके यांनी केला तसेच शिवसृष्टी बाबत राजकारण न करता काही सूचना,संकल्पना असतील तर कळवाव्या त्यांचाही विचार केला असेही बेनके यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणूक विजयाला एक वर्ष झाले,त्यानिमित्ताने त्यांनी जुन्नर येथे पत्रकारांशी संवाद साधला.





