‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच’, हवाई दलाने केला मोठा दावा, म्हटले- आम्ही सर्व लक्ष्य पूर्ण केले, लवकरच संपूर्ण माहिती देऊ

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानदरम्यान शनिवारी जाहीर झालेला युद्धबंदी करार अवघ्या काही तासांत तुटला असून, भारतीय वायुसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरू असल्याचा मोठा दावा केला आहे. वायुसेनेने रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे ऑपरेशन अत्यंत अचूकतेने आणि व्यावसायिक पद्धतीने राबवले जात आहे. लवकरच याबाबत सविस्तर माहिती जाहीर केली जाईल. तूर्तास, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही वायुसेनेने केले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ ७ मे रोजी सुरू झाले, ज्यामध्ये पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून होता, ज्यात २६ निष्पापांचा बळी गेला. दरम्यान, शनिवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांदरम्यान शांती करार झाल्याचा दावा केला होता, परंतु काही तासातच पाकिस्तानने राजौरी आणि श्रीनगरजवळ गोळीबार करत युद्धबंदीचा भंग केला. श्रीनगर आणि बारामूलामध्ये स्फोटांचा आवाज ऐकू आला. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी याबाबत चिंता व्यक्त केली.
The Indian Air Force (IAF) has successfully executed its assigned tasks in Operation Sindoor, with precision and professionalism. Operations were conducted in a deliberate and discreet manner, aligned with National Objectives.
Since the Operations are still ongoing, a detailed…
— Indian Air Force (@IAF_MCC) May 11, 2025
भारताने पाकिस्तानवर युद्धबंदी भंगाचा आरोप केला असून, दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी बैठक घेणार आहेत. सध्या परिस्थिती शांत असली, तरी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.





