पिंपरी | किवळे हद्दीतील पथदिवे बंद
Updated On:

किवळे, (वार्ताहर) – कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील किवळे हद्दीतील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या सुमारास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे, हे दिवे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
द्रुतगती पुलावरून देहूरोड बाजूला जाताना बहुतेक पथदिवे गेल्या एक महिन्यांपासून बंद आहेत. या रस्त्याने काही वाहने लेखा फार्म, उत्तमनगरकडे जाण्यासाठी डाव्या बाजूने वळतात. तर, मुंबई द्रुतगतीने आलेली वाहने द्रुतगती पुलाच्या अलीकडे एक्झिट घेऊन देहूरोड बाजूला जाणाऱ्या सेवा रस्त्यास मिळतात.
या मार्गावरील पथदिवे बंद पडण्याचा प्रकार गेल्या एक वर्षापासून सातत्याने घडत आहे. त्यामुळे, संबंधितांनी देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदारावर खर्च होणाऱ्या पैशातून कपात करावी आणि ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





