पाकिस्तानशी फक्त पीओकेवर चर्चा होईल- राजनाथ सिंह

नवी दिल्ली: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देणे थांबवल्याशिवाय चर्चा शक्य नाही. तसेच पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती केवळ पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) वर असेल, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंह यांनी भाजपाच्या जन आशीर्वाद रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी सिंह एका मेळाव्याला संबोधित करत होते.

सिंह म्हणाले “जर पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती पीओके (पाक व्याप्त काश्मीर) वर होईल, इतर कोणत्याही मुद्दय़ावर नाही.” पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधायचा असेल तर त्यांना दहशतवादाचे समर्थन व प्रोत्साहन देणे थांबवावे लागेल. कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान घाबरले आहे. पाकिस्तान विविध देशांकडून मदत मागत आहे. आम्ही कोणता गुन्हा केला आहे? आम्हाला धमकी का दिली जात आहे? मात्र, जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले असून, भारताशी चर्चा सुरू करण्यास सांगितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.