फक्त पवार साहेबांमुळे अजित पवारांना संधी मिळाली, पण त्यांनी घाणच केली; भाजपची टीका

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील टीका टिप्पणी दररोज सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखे १०० नेते देवेंद्र फडणवीस खिशात घेऊन फिरतात, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. याला आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

चंद्रकांतदादा अजित पवारांवर बोलल्यावर नेमकेच राष्ट्रवादीवाले विस्कटले. अजित पवार मोठा नेता नाही, त्यांना मोठा नेता मानन्याचं कारण देखील नाही, त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे पण त्यांनी घाण केली, त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं.

यावर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया आलेली नाही. या टीकेला राष्ट्रवादी काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.