जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीसाठी केवळ मोदी जबाबदार – काँग्रेस नेते 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूका जवळ आल्या असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

गुलाम नबी आझाद यांनी म्हंटले कि, २०१४ पर्यंत जम्मू-काश्मीरची परिस्थिती ठीक होती. परंतु, २०१४ नंतर जम्मू-काश्मीरची परिस्थिती पुन्हा एकदा १९९०-९१ सालासारखी झाली आहे. यासाठी केवळ एकच व्यक्ती जबादारआहे आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरच्या पोलिसांवरही टीका करत म्हणाले, तेही (जम्मू-काश्मीर पोलीस) शत्रूंपेक्षा कमी नाहीत. त्यांनीही अनेक अत्याचार केले आहेत. जे देशासाठी शहीद झाले त्यांना मी सलाम करतो. परंतु, काही असेही आहेत आपल्या प्रमोशनसाठी आणि पैशांसाठी लोकांची हत्या करतात, असे ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे घोषणापत्र नव्हे तर घोटाळेबाजपत्र आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी अरुणाचल प्रदेशमधील प्रचार सभेत केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.