पुणे, दि. 20- शहरात सापडलेला पहिला करोनाबाधितही पर्यटनासाठी परदेशवारी करून आलेला होता. त्यानंतर आतापर्यंत परदेशांतून शहरात आलेले अथवा परदेशांतून सहलीवरून आलेल्या अवघ्या 21 जणांनाच करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
एकूण बाधितांच्या तुलनेत हा आकडा अवघा 0.20 टक्के आहे. त्यामुळे परदेशातून हा आजार आलेला असला, तरी परदेशातून आलेल्या नगण्य व्यक्तीच या आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. तर, आता हे संक्रमण स्थानिक पातळीवरच वाढले आहे.