सध्या कोरोनाच्या काळात आपण ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य दिलं आहे. मात्र यात अनेकांची फसवणूकसुद्धा झाली. या फसवणुकिमुळे चंद्रपूरच्या एका 18 वर्षींय मुलाने आपलं आयुष्य संपवलं. मोबाईल खरेदी केला होता त्यात अनेक अनावश्यक वस्तु आल्या त्यापाहून त्याला धक्का बसला. परिस्थिती हलाखिची असल्याने त्याला तो धक्का सहन करता आला नाही आणि त्याने आपलं आयुष्य संपवलं.
याच काळात सायबर सेक्यूरीटी विभागाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या. आता सगळ्या ई-कॉमर्स वेबसाईटवर बीग बिलियन सेल सुरु होणार आहे. आपण सगळेच या सेलची वाट बघत असतो. खुप कमी किमतीत आपल्याला अनेक वस्तू खरेदी करता येतात. मात्र या वस्तू खरेदी करण्यासाठी आणि या सेल दरम्यान आपली फसवणून होऊ नये यासाठी या काही महत्वाच्या टिप्स…
- शॉपिंग करत असताना ती बेवसाईट नक्की खात्रीची आहे का? हे पडताळून पहा.
- फ्लिपकार्ट, अॅमेझॉन ही ऑनलाईन बाजारपेठ आहे. यावर अनेक बेवसाईट आपला व्यवसाय चालवतात. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेली वस्तूची नक्की चांगली वेबसाईट आहे याची खात्री करुन घ्या
- अनेक वेबसाईटला url लिंक जवळ पुढे लहान लॉक असलं त्याच वेबसाईटवरुन खरेदी केल्यास फसवणुकीचा धोका कमी असतो.
- कोणत्याही प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन पाहूनच वस्तू खरेदी करा.
- कपडे खरेदी करताना माप हे महत्वाचं असतं. प्रत्येक ब्रँडचा मॅप चार्ट हा वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही स्वत:चं माप आधी लिहून काढा. त्यात कंबर, खांदे, हीप लाईन, टमी लाईन, बेस्ट लाईन, छाती याचं माफ आधिच घेऊन ठेवा. त्यानुसार मॅप चार्ट टॅली करा आणि कपड्यांची खरेदी करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या मापाचे कपडे सहज कळतील आणि खरेदी करता येतील.
- प्रत्येकवेळी ऑनलाईन पेमेंट हा पर्याय स्विकारु नका. कारण त्यात आपले बँक डिटेल्स जातात. सध्या फसवणुकीचे प्रकार टाळायचे असतील आणि आपला डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर नेहमी COD म्हणजेच कॅश ऑन डिलिव्हरीचाच पर्याय निवडा.