नेवासा – फेसबुकवरुन आठवड्याभरापुर्वी तीन कॉटन शर्ट मागवणे एका प्राथमिक शिक्षकाला चांगलाच महागात पडलं आहे. कुरियरने आलेल्या या पार्सलमध्ये चक्क महिलेचा जुना पंजाबी टॉप अन् पुरुषांचे जुने दोन शर्ट आणि एक महिलेचा जुना गाऊन आला आहे. आपली ऑनलाईन फसवणुक झाल्याचे लक्षात येताच या शिक्षकाने एक निवेदन प्रसिद्ध करत आपली कैफियत मंडळी आहे. तसेच आपली फसवणुक झालेली आहे, माञ इतरांची फसवणुक होवू नये यासाठी समाजातील इतर बांधवांनी ऑनलाईन शॉपिंगकरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही या शिक्षकाने केले आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, नेवासा फाटा येथील प्राथमिक शिक्षक संजय आगळे यांनी मागील आठवडाभरापुर्वी फेसबुकवरुन तीन कॉटन शर्ट बुकिंग केलेले होते. ‘त्या’ बुकिंगचे पार्सल एका खासगी कुरिअर कंपणीच्या कुरियरने बॉयने रविवार (दि.७) रोजी आगळे यांच्या निवासस्थानी आणून दिले.
मात्र त्यामध्ये महिलेचे जुने टॉप पुरुषांचे जुने दोन शर्ट आणि एक जुना गाऊन मिळाल्यामुळे फसवणुक झालेल्या शिक्षकांनी कुरियर बॉयला घटनेची माहीती दिली. मात्र आलेले पार्सल परत घेण्यास त्याने असमर्थता दर्शविली. तसेच कंपनीशी संपर्क साधला असता त्यांचा फोनही बंद दाखविली जात होता. या शिक्षकाने एक हजार सत्तर रुपये मोजून कुरियर ताब्यात घेवून पाहीले असता अशी फसवणुक झाल्याचे अघड झाले. इतरांचीही फसवणुक होवू नये यासाठी या शिक्षकानेही इतरांना ‘सावध’ भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.