पिंपरी | तिस–या राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन

पिंपरी, (प्रतिनिधी) – योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सवा निमित्त, तिस–या राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑनलाईन होणार असून, स्पर्धेत सबजुनिअर (वय १० ते १५ वर्षे) ज्युनिअर (वय १५ ते २१ वर्षे), सिनिअर (वय २१ ते ३० वर्षे, ३१ ते ४० वर्षे, ४१ ते ५० वर्षे, ५१ ते ६० वर्षे) आणि ६० वर्षावरील महिला व पुरूष असे वेगवेळे गट आहेत
स्पर्धा केवळ पारंपरिक योगा प्रकारात (ट्रेडिशनल योगा) घेतली जाणार आहे. अंतिम फेरीही ऑनलाईन पध्दतीने होईल. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेता खेळाडूंना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेसाठी बुधवार (दि. २५) व्हिडीओ पाठवून नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख राहुल येवला किंवा तांत्रिक संचालक मनाली देव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांनी केले.





