Online Games: ऑनलाइन गेमिंगमुळे मेंदूला झटका ; रक्तदाबामुळे मेंदूची नस फुटल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Online Games: ऑनलाइन गेमिंगमुळे काही दिवसापूर्वी सख्या तीन बहिणींनी स्वतः ला संपवलं, ही घटना ताजी असतानाच मेरठमधील दिल्ली गेट पोलिस स्टेशन परिसरात आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे.

Online Games: ऑनलाइन गेमिंगमुळे काही दिवसापूर्वी सख्या तीन बहिणींनी स्वतः ला संपवलं, ही घटना ताजी असतानाच मेरठमधील दिल्ली गेट पोलिस स्टेशन परिसरात आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे.
ज्याठिकाणी एका २२ वर्षीय तरुणाचा ऑनलाइन गेम खेळताना संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांच्या मते, गेम खेळताना त्याचा रक्तदाब अचानक वाढला, ज्यामुळे त्याची तब्येत बिघडली. त्याच्या मृत्यूचे कारण मेंदूतील रक्तस्राव असल्याचे मानले जात आहे.
मृत व्यक्तीची ओळख मोहम्मद कैफ अशी झाली आहे, तो खैरनगर गुलर वाली याठिकाणी रहिवासी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कैफ बराच वेळ ऑनलाइन गेम खेळत होता. घटनेच्या दिवशी तो कानात इअरफोन लावून मोबाईलवर गेम खेळत होता. त्यानंतर त्याला प्रचंड डोकेदुखी आणि अस्वस्थतेची तक्रार केली. त्यानंतर काही वेळातच तो खाली कोसळला.
त्याच्या कुटुंबाने त्याला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात नेले, ज्याठिकाणी त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्याठिकाणी दोन दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही त्याचा जीव वाचू शकला नाही.
रुग्णालयातील सूत्रांनुसार, दाखल होताना त्याचा रक्तदाब ३०० च्या वर पोहोचला होता, जो एक अतिशय धोकादायक स्थिती मानला जातो. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की,त्यांना त्याच्या गेमिंग व्यसनाबद्दल माहिती नव्हते. ते बोलण्याचे टाळत आहेत.
स्थानिकांच्या मते, कैफ अनेकदा तास तास मोबाईल गेम खेळत असे. यापूर्वी गाझियाबादमधील तीन बहिणींनी गेमिंग व्यसनामुळे आत्महत्या केली होती. या प्रकरणांबद्दल, डॉक्टर म्हणतात की जास्त ताण, उत्साह आणि दीर्घकाळ स्क्रीनवर बसणे यामुळे तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.




