शस्त्रांची ऑनलाइन विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – गृहमंत्र्यांचे आश्वासन
Updated On:

मुंबई – अहमदनगर येथील एका तरुणाने राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने शस्त्रांची विक्री होत असल्याचे प्रकरण निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत शास्त्रांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्रात कोणी शस्त्र बाळगावेत, कोणी शस्त्र विक्री करावी, याबाबतचे काही नियम आहेत. यासदर्भात औरगांबादमध्ये ऑनलाइन शस्त्रांची विक्री होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कुणी ऑनलाइन शस्त्रांची विक्री करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल”





