पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून दिला आहे. यावर्षी 4 ऑक्टोबर 2020 रोजी यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा झाली.
ऐन करोना संक्रमण काळात पुरेशा आरोग्य विषयक खबरदारीसह ही परीक्षा घेण्यात आली. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांनी 28 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मुख्य परीक्षेसाठी अर्ज करावयाचा आहे.
डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म उमेदवारांना ऑनलाइन भरायचा आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवार यूपीएससीच्या दिल्लीस्थित मुख्यालयातील फॅसिलिटेशन काउंटरशी संपर्क साधू शकतील. त्यासाठी संकेतस्थळावर दूरध्वनी उपलब्ध आहे.