OnePlus Nord 3 Explodes: OnePlus ने अलीकडेच आपल्या Nord सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. आता OnePlus Nord 3 स्मार्टफोनमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वापरकर्त्याने X (Twitter) वर OnePlus Nord 3 च्या स्फोटाची माहिती दिली असून त्याने हा OnePlus स्मार्टफोन 21 जुलै 2023 रोजी Amazon वरून खरेदी केला होता.
रितेश कुमार मीणा वापरकर्त्याच्या मते, त्याने 21 जुलै 2023 रोजी Amazon वरून OnePlus Nord 3 स्मार्टफोन घेतला होता. आणि मध्यरात्री या फोनचा स्फोट झाला. रितेश सांगतो की, त्याचा 8 वर्षांचा मुलगा या अपघातातून कसातरी बचावला. परंतु त्याची ऐकण्याची क्षमता कमी झाली असून इतर अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होत आहेत. सध्या रितेशच्या मुलावर उपचार सुरू आहेत.
Kindly see the intensity of #oneplusnord3 @OnePlus_IN @onepluscareIN @PeteLau
mobile blast. A brand new mobile blasted with in couple of days of its purchase. What about my 8 year old child future who has suffered hearing loss as well as mental trauma due to this #oneplusblast pic.twitter.com/ileNmu0ORp— ritesh Kumar meena (@RiteshMee36153) July 26, 2023
राजधानी दिल्लीत राहणाऱ्या रितेशने वनप्लस इंडिया, अॅमेझॉन, ओप्पो इंडिया आणि दर्शिता इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रितेश सांगतात की, यासोबतच त्यांनी वनप्लस आणि अॅमेझॉनच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक तक्रारी नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे ट्विटर अकाउंट कंपन्यांनी ब्लॉक केले.
रितेश यांनी सोशल मीडियावर सांगितले की, वनप्लस कंपनीची टीम त्यांच्या घरी आली आणि ब्लास्ट झालेला फोन त्यांच्याकडे देण्यास सांगितले. परंतु कंपनीने पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, 2022 मध्ये देखील OnePlus Nord 2 स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. सोशल मीडिया अकाउंटवर अनेक युजर्सनी तक्रारी केल्या होत्या. सध्या, कंपनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर, अनेक वापरकर्त्यांनी फोनमध्ये ग्रीन लाइनच्या समस्येबद्दल माहिती दिली आहे. वनप्लसकडून सांगण्यात आले आहे की, सध्या संबंधित टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे. आणि कंपनीने यूजरला फोनचा डिस्प्ले मोफत बदलण्याची ऑफर दिली आहे.