नवी दिल्ली: चीनी स्मार्टफोन निर्माता वनप्लसने आपला या वर्षाचा बहुप्रतिक्षित वनप्लस १५ (OnePlus 15) फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लॉन्च केला आहे. अलीकडेच चीनमध्ये लॉन्च झालेला हा फोन आता भारतीय बाजारपेठेत दाखल झाला असून, तो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ (Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5) चिपसेटसह येणारा भारतातील पहिला स्मार्टफोन ठरला आहे. कंपनीने वनप्लस १३ (OnePlus 13) नंतर थेट वनप्लस १५ लॉन्च केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. चीनमध्ये ‘१४’ हा अंक अशुभ मानला जात असल्याने, कंपनीने ‘१४’ ऐवजी ‘१५’ मॉडेल लॉन्च करण्याचा निर्णय घेतला असावा, असा कयास लावला जात आहे. या पॉवरफुल स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स खालीलप्रमाणे आहेत. किंमत आणि उपलब्ध ऑफर्स -मूलभूत व्हेरिएंट (12GB+256GB): -किंमत: ₹७२,९९९ -कॅशबॅक/ऑफरनंतर प्रभावी किंमत: ₹६८,९९९ -टॉप व्हेरिएंट (16GB+512GB): -किंमत: ₹७९,९९९ -कॅशबॅक/ऑफरनंतर प्रभावी किंमत: ₹७५,९९९ आजपासून (१३ नोव्हेंबर) रात्री ८ वाजल्यापासून या फोनची विक्री भारतात सुरू होणार आहे. लिमिटेड पीरियड ऑफर: ग्राहक टॉप व्हेरिएंट खरेदीवर वनप्लस नॉर्ड बड्स ३ (OnePlus Nord Buds 3) मोफत मिळवू शकतात. तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध: सँड स्टॉर्म (Sand Storm), इनफायनाईट ब्लॅक (Infinite Black) आणि अल्ट्रा वायलेट (Ultra Violet). दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स – फीचर तपशील डिस्प्ले ६.७८ इंचाची LTPO AMOLED डिस्प्ले रिफ्रेश रेट १६५ Hz (हर्ट्झ) संरक्षण गोरिल्ला ग्लास विक्टस २ प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ (३ nm आर्किटेक्चर) GPU ॲड्रेनो ८४० (Adreno 840) ऑपरेटिंग सिस्टीम ॲन्ड्रॉइड १६ (Android 16) आधारित OxygenOS 16 रॅम १६ GB पर्यंत बॅटरी ७,३०० mAh (सिलिकॉन कार्बन आधारित) फास्ट चार्जिंग १२० W (चार्जर बॉक्समध्ये समाविष्ट) वायरलेस चार्जिंग ५० W रिव्हर्स चार्जिंग १० W डस्ट/वॉटर रेसिस्टंट IP68/IP69K रेटिंग कॅमेरा सेटअप – -वनप्लस १५ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. -प्रायमरी कॅमेरा: ५० मेगापिक्सल (OIS आणि मल्टी-डायरेक्शनल फेस डिटेक्शन ऑटोफोकससह) -पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स: ५० मेगापिक्सल -अल्ट्रा-वाइड लेन्स: ५० मेगापिक्सल -सेल्फी कॅमेरा: ३२ मेगापिक्सल (या कॅमेऱ्यातून 4K व्हिडीओ शूटिंग करता येते.) -इतर कॅमेरा फीचर्स: लेझर फोकस, कलर स्पेक्ट्रम सेन्सर, एलईडी फ्लॅश आणि HDR. कनेक्टिव्हिटी – वायफाय (WiFi): 802.11 a/b/g/n/ac/6/7 (डुअल/ट्राय-बँड) ब्लूटूथ (Bluetooth): 6 सुरक्षा: अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर हा स्मार्टफोन पॉवर, परफॉर्मन्स आणि बॅटरीचा उत्तम मेळ साधतो आणि प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवीन बेंचमार्क सेट करू शकतो.