Pratap Sarnaik : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख ऑटोरिक्षा देणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पन्नात भर घालण्यास मदत करण्यासाठी पुढील पाच वर्षांत एक लाख प्रवासी ऑटोरिक्षा देणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी गुरुवारी सांगितले.

Pratap Sarnaik : राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पन्नात भर घालण्यास मदत करण्यासाठी पुढील पाच वर्षांत एक लाख प्रवासी ऑटोरिक्षा देणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी गुरुवारी सांगितले. वांद्रे येथील परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरनाईक बोलत होते.
अनंतांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजनेअंतर्गत २०२७ ते २०३१ या काळात दरवर्षी २०,००० ऑटोरिक्षांचे वाटप केले जाईल आणि सरकार प्रत्येक वाहनाच्या किमतीवर १० टक्के अनुदान देईल.
वाहनाच्या किमतीच्या (Pratap Sarnaik) उर्वरित ९० टक्के रकमेसाठी राष्ट्रीयीकृत बँका, अनुसूचित बँका किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्जपुरवठा केला जाईल आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक कामगार कल्याण मंडळ या कर्ज प्रक्रियेत मदत करेल.
या योजनेत राज्यभरातील ३१० हून अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांचा समावेश असेल. म्हाडा सोडतीप्रमाणेच लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल, असे सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले.






