कवठे येमाई येथील अपघातात एक ठार, तर दुसरा गंभीर जखमी

सविंदणे : अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील इचकेवाडी हद्दीत इको गाडी व टु व्हिलर गाडीची समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये भीषण अपघातात टु व्हीलरवरील एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा जखमी झाला असून त्याच्यावर शिरूर येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ०५जून रोजी ७ वाजण्याच्या सुमारास कवठे येमाईतील इचकेवाडी येथील बस स्टॅन्ड जवळ पारगाव ते कवठे येमाई रोडवर दिपक येठेकर हा मोटार सायकल नं. एम. एच. 16. सी. आर. 7785 चालवित जेवणाचा डब्बा आणण्याकरता गेला होता. त्याच्यासोबत कामगार रंगनाथ बन्सी आढाव देखील होता. त्यावेळी कवठे येमाई बाजूकडून पारगाव बाजूकडे राँग साईडने येणा-या इको गाडी नं. एम.एच.12.टी.डी.8718 वरील अज्ञात चालकानेभरधाव वेगात चालवली आणि दिपक येठेकर व त्याचे पाठीमागे बसलेला रंगनाथ बन्सी आढाव यांना समोरासमोर धडक दिली.
त्यामध्ये दिपक येठेकर वय 33 वर्षे( मु. पो. गुंडेगाव, ता. जि. अ. नगर ) याचा मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेला रंगनाथ आढाव हे जखमी झाले आहेत. इको गाडी नं. एम. एच. 21. टी. डी. 8718 वरील अज्ञात चालकाविरूद्ध मयताचा भाऊ अमोल गोरक्ष येठेकर यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहे.





