सविंदणे (प्रतिनिधी) – सविंदणे येथील श्री गुरूदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक (विज्ञान शाखा) विद्यालयातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (एस. एस. सी) बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकावर गोसावी तृषा दिपक ( 93.80), नरवडे अनुष्का भाऊसाहेब (93.00) दुसाने गौरव योगेश (91.80) यांनी बाजी मारली.
त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन करून विद्यालयाचा निकाल १०० टक्के लावण्यात मोलाची कामगिरी केली. सर्व विद्यार्थ्यांना माजी प्राचार्य चंद्रशेखर औटी, जेष्ठ शिक्षक अविनाश महामुनी, डॉ.अजित कोकरे, प्रमोद भोईर, विकास शिंदे, सुषमा लोखंडे, नामदेव कंठाळी, वंदना शिंदे, स्वाती तांबे, सोनाली लंघे, कविता मोरे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यमान सरपंच संतोषशेठ मिंडे, आजी -माजी सरपंच व सर्व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या प्राचार्य चंद्रशेखर औटी सर शिक्षकांचे कौतुक केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशी माहिती वर्ग शिक्षक विकास शिंदे व वंदना शिंदे यानी दिली.