फलटण -कोळकी, ता. फलटण येथील विजय रामचंद्र मुळीक (वय 57, रा. सावता माळीनगर, कोळकी) हे मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माळजाई मंदिरात मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला. ते राज्य उत्पादन शुल्क विभागात हवालदार म्हणून कोल्हापूर येथे नेमणुकीस होते. लॉकडाऊनमुळे ते नोकरीवर गेले नव्हते.
प्राथमिक चौकशीत मुळीक हे दारूच्या आहारी गेल्याचे सांगण्यात आले. ते सकाळपासून घराबाहेर होते. दारू पिल्यानंतर ते माळजाई मंदिरात आले होते. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्याते अकस्मात मृत्यू म्हणून झाली असूनहवालदार लावंड तपास करत आहेत.