मुंबईत लसीकरणाचा एक कोटींचा टप्पा पार
Updated On:

मुंबई – संपूर्ण जगासह देशात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने धाकधुक वाढवली आहे. दुसरीकडे मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बात समोर आली आहे. मुंबई महापालिकेन करोना लसीच्या पहिल्या डोसचा एक कोटीचा टप्पा पार केला आहे.
या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महापालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे.
देशभरात करोना विषाणूपासून सुटका मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहेत. राज्यात लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग असून मुंबईत करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता पूर्ण केला आहे.
मुंबईत आजवर कोविड लसीची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा मिळून सुमारे 1 कोटी 81 लाखांपेक्षा अधिक लशी देण्यात आल्या आहेत. एकूण दोन कोटी मात्रांचा टप्पा गाठण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरु आहे.




