पिंपरी | देहूरोडमध्ये पिस्टलसह एकाला अटक
Updated On:

देहूरोड (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई देहूरोड एम.बी. कॅम्प येथील श्रीकृष्ण मंदिराजवळ शनिवारी (दि. ३०) सकाळी अकराच्या सुमारास करण्यात आली. कुणाल सुभाषचंद्र वाल्मीकी (वय २९, रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीस शिपाई स्वप्निल साबळे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एक जण पिस्टल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली,
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्याच्याजवळ विनापरवाना एक पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक राठोड करत आहेत.





