Harish Kumar : कधीकाळी लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत; एका दुर्दैवी घटनेने उद्ध्वस्त झालं अभिनेत्याचं करिअर
Harish Kumar : पाठीच्या कण्याशी संबंधित त्रासामुळे त्याला तब्बल दोन वर्षे अंथरुणावर काढावी लागली. नेमकं काय घडलं होतं, जाणून घेऊया.

Harish Kumar : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांनी अगदी कमी वयात लोकप्रियतेचं शिखर गाठलं. काही कलाकारांना पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली, तर काहींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. असाच एक अभिनेता म्हणजे हरीश कुमार.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्याची लोकप्रियता इतकी वाढली होती की, अनेक तरुणी त्याच्या प्रेमात पडल्या होत्या. मात्र, करिअर उत्तम सुरू असतानाच एका गंभीर दुखापतीने त्याच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. पाठीच्या कण्याशी संबंधित त्रासामुळे त्याला तब्बल दोन वर्षे अंथरुणावर काढावी लागली. नेमकं काय घडलं होतं, जाणून घेऊया.
१९ चित्रपटांमध्ये बालकलाकाराच्या भूमिकेत
हरीश कुमारने ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्याचा जन्म १ ऑगस्ट १९७५ रोजी हैदराबाद येथे झाला. अभिनयाची सुरुवात त्याने बालकलाकार म्हणून केली होती. १९७९ ते १९८७ या काळात तो तब्बल १९ चित्रपटांमध्ये बालकलाकाराच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर त्याने मुख्य अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
‘प्रेम कैदी’चित्रपटातून केलं पदार्पण
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळवल्यानंतर हरीश कुमारने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे, या चित्रपटात त्याने अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत काम केलं होतं. हा करिश्मा कपूरचाही पहिला चित्रपट होता. त्यावेळी करिश्मा १६ वर्षांची, तर हरीश कुमार अवघ्या १५ वर्षांचा होता. या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
रक्ताने पत्रं लिहिल्याचा किस्सा
‘प्रेम कैदी’नंतर हरीश कुमारने मागे वळून पाहिलचं नाही. ‘कुली नंबर १’, ‘तिरंगा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. त्याच्या चॉकलेट बॉय लूकमुळे तरुणींमध्ये त्याची प्रचंड क्रेझ होती. तब्बल १५ मुलींनी त्याला रक्ताने पत्रं लिहिल्याचा किस्सा सांगितला जातो. ही पत्रं त्याची बहीण आवडीने वाचत असे.
ज्युनिअर रजनीकांत म्हणूनही ओळख
हरीश कुमारची लोकप्रियता केवळ हिंदी चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित नव्हती. दक्षिण भारतातही त्याचे असंख्य चाहते होते. त्याच्या लूक आणि लोकप्रियतेमुळे त्याची तुलना सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी केली जायची. काही चाहते त्याला ‘ज्युनिअर रजनीकांत’ म्हणूनही ओळखत होते.
गंभीर आजारामुळे करिअरला लागला ब्रेक
मात्र, याच काळात त्याच्या आयुष्यात अनपेक्षित वळणं आलं. हरीश कुमारला पाठीच्या कण्याशी संबंधित स्लिप डिस्कचा गंभीर त्रास सुरू झाला. सुरुवातीला जाणवणारा हा त्रास पुढे इतका वाढला की, त्याला साधे स्वच्छतागृहापर्यंत जाणंही कठीण होऊ लागलं. या दुखापतीमुळे त्याच्या दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम झाला. जवळपास दोन वर्षे त्याला अंथरुणावरच खेळला होता. परिणामी गंभीर दुखापतीमुळे हरीश कुमारला चित्रपटसृष्टीपासून दूर राहावे लागले.
Stress Management: सतत टेन्शन घेण्याची सवय पडेल महागात! शरीरातील ‘या’ ३ अवयवांवर होतो परिणाम





