“तिला जगू द्या…” पोस्टवर नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील काही दिवसांपूर्वी “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत त्यांनी अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? सवाल केला होता. मात्र आता त्यांचा या पोस्टमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
महेश टिळेकर आणि अभिनेता आरोह वेलणकर यांच्यात फेसबुकवर वाद सुरू आहे. आरोह वेलणकरने फेसबुकवर पोस्ट लिहित राग व्यक्त केला.
काय आहे आरोह वेलणकर यांनी पोस्ट
‘महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा! कोण समजता तुम्ही स्वत:ला!?
ह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहे! फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं! सुधरा…
राहीला प्रश्ण मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू!’
https://www.facebook.com/arohwelankarofficial/posts/2348405955305786