पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
Updated On:

मुंबई :- पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून हे नवीन वर्ष पारसी बांधवांच्या आणि सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल, राज्य आणि देश कोरोनामुक्त होईल, अशा सदिच्छाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे ‘पतेती’चा सण आणि नववर्षाचं स्वागत घरी थांबून, सुरक्षितपणे साजरा करावा. स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.





