पुणे – मिसळ म्हटलं कि लगेच आठवतो तो तर्रीदार, ठसकेदार रस्सा त्यातल्या त्यात मिसळ म्हणजे पुणेकरांचा जणू जीव की प्राणच. मिसळीचे घर म्हणून पुण्याची ओळख आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ आपल्याला पुण्यात खायला मिळतात पण आज पुण्यामध्ये जगप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी पुणेकरांसाठी तब्बल पाच हजार किलोची मिसळ तयार केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘भव्य एकता मिसळ’ हा उपक्रम राबवण्यात आला असून १ लाख लोकांना या मिसळीचे वाटप करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या मिसळीचा आस्वाद घेतला आहे. यावेळी मिसळ खाण्यासाठी पुणेकरांची अक्षरशः झुंबड उडाल्याची बघायला मिळत आहे.