बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणजे, रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण. एवढंच नाहीतर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीतही या दोघांचाही समावेश होतो. हे दोघेही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याने त्यांचे फॅनफॉलोअर्सही लाखोंच्या संख्येने आहेत. अशातच दीपिकाने काही दिवसांपूर्वी आपला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. जो तिच्या अनेक फॅन्सला फार आवडला. पण दीपिकाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या सर्व फॅन्समध्ये एका खास फॅनचाही समावेश होता.
तो म्हणजे, रणवीर सिंह. दीपिकाने नुकताच तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर तिच्या अनेक फॅन्सच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे. त्यावर रणवीर सिंहनेही एक कमेटं केली आहे. दीपिकाने शॉर्ट हेअर लूकमधील एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना दीपिकाने “ताडा’ असे कॅप्शन दिले होते. याच फोटोला रणवीरने “मार दो मुझे’ अशी कमेंट केली आहे.
दरम्यान, दीपिकाचा मचअवेटेड चित्रपट “छपाक’चे शुटिंग पूर्ण झाले आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.