नागपूरमध्ये ओमायक्रॉन पहिला रुग्ण

नागपूर – मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरियंटने नागपूरमध्ये शिरकाव केला आहे. नागपूरमध्ये 40 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे, अशी माहिती नागपूरचे आयुक्त राधाकृष्णन यांनी दिली आहे.
ओमायक्रॉन पॉसिटीव्ह आढळलेल्या 40 वर्षीय रुग्णाचा पश्चिम आफ्रिकेतील प्रवासाचा इतिहास आहे. हा व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची करोना चाचणीसह जीनोम सिक्वेन्सिंग ही करण्यात आली होती. त्यानंतरच त्याला ओमायक्रॉन संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे.
संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आले आहेत. त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संबंधित रुग्णच्या संपर्कातील इतर लोकांची ट्रेसिंग केली जात असून त्यांच्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत. चार डिसेंबर रोजी संबंधित व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. यामध्ये तो करोनाबाधित असल्याचे निदान झाले होते.





