पुराच्या पाण्यात अकडलेल्या कुटुंबासाठी ओमराजेंचा मदतीचा हात; एनडीआरएफच्यासोबत स्वत: पाण्यात उतरले अन्…

Omraje Nimbalkar : राज्यात मराठवाडा आणि विदर्भ भागातील सर्वच जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्ह्यातही पावसाने थैमान घातलं असू पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात साचले आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी इथं धुव्वाधार पाऊस झाला आहे.
येथील अनेक भागातील नागरिकांना एनडीआरएफ पथकांकडून सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. याबाबतची माहिती धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. ते स्वतः बचावकार्यात सहभागी झाले होते. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट करून माहिती दिली.
खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केलेल्या पोस्टनुसार, वडनेर ता.परंडा येथे एकाच कुटुंबातील एक आजी व 2 वर्षाचा मुलगा व 2 व्यक्ती रात्री 2 पासून पूर्ण पूराच्या पाण्याने वेढलेले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ओम राजेनिंबाळकर त्वरित एनडीआरएफच्या पथकासोबत बचावकार्यात सहभाग घेतला.





