पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर ओंकारेश्वर मंदिर महाशिवरात्रीला बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात येणार नाही. परंतु, भाविकांनी मंदिराच्या बाहेरून महादेवाचे दर्शन घेतले आहे.
दरम्यान, ओंकारेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सध्याचा शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, खबरदारीचा उपाय म्हणून ओंकारेश्वर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना प्रवेश देण्यात येणार नाही. आगाऊ नोंदणी करून महाशिवरात्रीचा अभिषेक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे देवस्थानचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.