मुंबई – यंदाच्या नवीन वर्षाचा जल्लोष सर्वच लोकांनी सोशल मीडियावर अपडेट देत साजरा केला. त्यातल्या त्यात बॉलीवूड सेलेब्सने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या पासूनच नवीन वर्षाचे सेलिब्रेशन प्लॅन आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे शेअर केले मात्र, या सगळ्याला अपवाद ठरले ते म्हणजे बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थातच दीपिका पादुकोणचे सोशल मीडिया अकाउंट.
दीपिका पादुकोणचे इन्स्टाग्राम अकाऊंट, ट्विटर इतकेच नाही तर फेसबुक पूर्णपणे खाली आहे. होय, या अकाऊंटवरच्या सगळ्या पोस्ट डिलीट झल्या आहेत. होय, त्यावर एकही पोस्ट नाही. दीपिकाचे सोशल अकाऊंट अचानक अशापद्धतीने खाली झालेले पाहूनच साहजिकच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, तिच्या सोशल अकाऊंट अचानक अशापद्धतीने खाली झाल्यामुळे सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या विषयी चर्चा रंगली आहे तिच्या मनात नेमके चाललेय तरी काय? जुन्या सगळ्या आठवणी तिला पुसून काढायच्या आहेत की हा प्रमोशनचा फंडा आहे? अशा कंमेंट्स नेटकऱ्यांद्वारे केली जात आहे.