Siya Chetan Video : मॅच पाहताना सिया आणि चेतनचा जुना VIDEO व्हायरल; ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष!
Siya Chetan Video : दरम्यान, या प्रकरणात आणखी एक नवी घडामोड समोर आली असून, सिया आणि चेतन यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Siya Chetan Video : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नावाची चर्चा राज्यभरात सुरू आहे. आता हे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनलं आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांकडून अग्रवाल आणि गोयल कुटुंबाकडून माहिती घेतली जात आहे. लोणावळा पोलिसांत सियाचे आई वडिल प्रवीण गोयल आणि पूजा गोयल यांची तब्बल १२ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक नवी घडामोड समोर आली असून, सिया आणि चेतन यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी परिधान करून स्टेडियममध्ये एकत्र सामना पाहताना दिसत आहेत. दोघेही खेळाडूंना प्रोत्साहन देत सामन्याचा आनंद घेत असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळते. हा व्हिडिओ त्यांच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळातील असल्याचे सांगितले जात असून तो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या कृतीने लक्ष वेधले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांची पहिली भेट सियाचा भाऊ साहिल गोयल याच्या क्रिकेट सामन्यादरम्यान झाली होती. त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत दोघांची पुन्हा भेट झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी त्यांच्या घरच्यांना प्रेमसंबंधाबाबत सांगितले होते की नाही याबाबत तर्क वितर्क बांधले जात आहे.
दरम्यान, सिया आणि चेतन यांच्यात कथित प्रेमसंबंध असल्याची कोणतीही कल्पना नव्हती, असा दावा दोन्ही कुटुंबीयांनी केला आहे. केतनच्या वडिलांनी सांगितले की, सियाने सुरुवातीलाच लग्नाला नकार दिला असता तर हा विवाह ठरण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. सियाच्या कुटुंबीयांनीही या संबंधांविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Chetan and Siya were watching a match that was being broadcast on national television.
Wouldn’t Siya’s parents or some relative have seem them?Siya’s parents knew everything, yet they kept this fact hidden from Ketan. 🤔 pic.twitter.com/B1dhLLf8AH
— Krisha 🌸 (@KrishaAsiagh) June 27, 2026
याशिवाय, केतनची हत्या करण्यापूर्वी आदल्या दिवशी सिया आणि चेतन यांनी पुण्यातील एका कॅफेमध्ये भेट घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. या भेटीतच हत्येचा कट शिजला आणि त्याचे प्लॅनिंग करण्यात आले. आता पोलिसांकडून या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती घेतली जात असून, ज्या कॅफेत भेट झाली होती. तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुराव्यांचीही बारकाईने पडताळणी सुरू आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२,००४ वेळा एकमेकांसोबत फोनवरुन संवाद
तपासादरम्यान पोलिसांनी दोघांच्या मोबाईल फोनमधील कॉल रेकॉर्डचे विश्लेषण केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारीपासून सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २,००४ वेळा एकमेकांसोबत फोनवरुन संवाद झाला. त्यांच्या संभाषणाचा एकूण कालावधी २३८ तासांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. या कॉल रेकॉर्ड्सना तपासातील महत्त्वाचा डिजिटल पुरावा मानले जात असून, डिलीट केलेले व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम चॅट्सही फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.





