मनोरंजनासह हास्याचे फवारे : विनोदी कमेंटचा “ट्रेंड’
पुणे -सध्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच जण घरी आहेत. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी अनेकजण सोशल मीडियावर चांगलेच “ऍक्टिव्ह’ झाले आहेत. त्यामुळे या काळात रोज नवी शक्कल लढवण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपासून जुन्या फोटोवर विनोदी “कमेंट’ करण्याचा “ट्रेंड’ भलताच जोरात असल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनच्या काळात बहुतांशजण मित्रांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावर संवाद साधतात. सध्या तरुणांकडून वेगवेगळे ट्रेंड, चेलेंजेस व्हायरल करण्यात येत आहेत. यामध्ये आता मित्र- मैत्रिणींचे जुने फोटो “टार्गेट’ झाले आहेत. नेहमी कट्ट्यांवर मित्र मैत्रिणींच्या चेष्टा आता फेसबुक, इस्टाग्रामच्या माध्यमातून होत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून फेसबुकवर यमक कविता, चारोळ्या जुळवून मित्र-मैत्रिणींची चेष्टा करण्याचा ट्रेन्ड भलताच जोरात असल्याचे दिसत आहे. यामुळे मनोरंजनासह हास्याचे फवारे उडत आहेत. आपला एखादा मित्र किंवा मैत्रिण यांचा जुना फोटो फेसबुकवर शोधायचा आणि त्याखालील कमेंट बॉक्समध्ये त्याला चिडवणाऱ्या ओळी तयार करून पोस्ट करायच्या असा फंडा राबवला जात आहे. विशेष म्हणजे, या अनोख्या प्रतिभेला इतर मित्र-मैत्रिणींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. इतकेच नव्हे तर, हे “शीघ्रकवी’ आता “मीम्स’चे देखील नवे टार्गेट झाले आहेत.
करोनामुळे सर्वच जण चिंतेत असल्याने विरंगुळा म्हणून हा सोशल हास्यप्रकार सर्वांच्याच मनोरंजनाचा विषय ठरत आहे. पण यातून एखाद्याची खिल्ली उडवताना “सोसेल तितकेच’ कविता रचण्याचा सल्ला नेटीझन्स देत आहेत. दरम्यान, गेल्या काही तासांत गंमतशीर काव्य रचनांचा महापूरच आल्याचे चित्र आहे.
चावला होता मच्छर आली याला खाज,
खरं खरं सांगा…
क्या हे आपले खूबसुरती का राज…
हि तर आहे खुंखार वाघीण ,
वाघिणीनें धरलाय ससा,
वाघीण बोलत नाही म्हणून कापल्या नागपूरच्या पोरांनी नसा..!
पुण्यात सापडला कोरोनाचा रुग्ण,
त्यातच झाले आता सर्व भाऊ मग्न…
अन ताई म्हणत्यात रुसुन, कधी होईल बाई माझं लग्न?
कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
या फोटोला बघून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना
Lockdown मधे चालू आहेत petrol pump,
कारण भाऊला जावई करणार आहेत स्वतः Donald trump
भाऊंनी केल स्वतःला self quarantine …!
भाऊंनी केल स्वतःला self quarantine…!
पोरी म्हणतात , काठ्या खाईन पण त्याला पाहूनच जाईन ! !