Ola Electric Scooter Price| ओला इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 25 हजार रुपयांनी झाली कमी, ऑफर फक्त 29 फेब्रुवारीपर्यंत

Ola Electric Scooter Price| ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 25,000 रुपयांनी कमी केली आहे. ओला इलेक्ट्रिकने शुक्रवारी याची घोषणा केली आणि सांगितले की सवलत किंमत फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंत आहे.
You asked, we delivered! We’re reducing our prices by upto ₹25,000 starting today for the month of Feb for all of you!! Breaking all barriers to #EndICEage!
Valentine’s Day gift for all our customers 🙂❤️🇮🇳 pic.twitter.com/oKFAVzAWsC
— Bhavish Aggarwal (@bhash) February 16, 2024
Ola S1 x+ ची किंमत झाली कमी –
कंपनीने Ola S1 X+ ची किंमत 1.09 लाख रुपयांवरून 84,999 रुपयांपर्यंत कमी केली आहे. तर त्याच्या Ola S1 Air ची किंमत 1.19 लाख रुपयांवरून 1.05 लाख रुपये करण्यात आली आहे.
Ola S1 Pro 18 हजार रुपयांनी स्वस्त –
Ola Electric ने Ola S1 Pro ची किंमत 18,000 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने Ola S1 Pro ची किंमत आधीच्या 1.48 लाख रुपयांवरून 1.30 लाख रुपये केली आहे.
तीन शहरांमध्ये वर्षाच्या अखेरीस 10,000 इलेक्ट्रिक दुचाकी विकण्याची ओलाची अपेक्षा आहे. कंपनीने आपली सेवा देशभरात विस्तारण्याचे लक्ष्यही ठेवले आहे. ओलाचा दावा आहे की या वाहनांच्या लाँचमुळे, त्यांच्याकडे आता देशातील इलेक्ट्रिक दुचाकींचा सर्वात मोठा ताफा आहे.
स्कूटर मालक बदलल्यास हस्तांतरित केली जाईल वॉरंटी –
ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक भविश अग्रवाल म्हणाले, “आम्ही कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय जास्तीची वॉरंटी देत आहोत… स्कूटरचा मालक बदलल्यानंतर वॉरंटी हस्तांतरणीय असेल.” ते म्हणाले की ओला ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारून 1,25,000 किलोमीटरपर्यंत वॉरंटी वाढवण्याचा पर्याय देखील असेल.
ही बातमी वाचा – Stock Market | सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 376 ने वधारला, निफ्टी 22 हजार पार
ही बातमी वाचा – Mahindra Shares Price | महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठी वाढ; जाणून घ्या कारण…





