Oily Hair Remedy: थंडीतही केस तेलकट होत आहेत? हे सोपे घरगुती उपाय एकदा करून बघा

Oily Hair Remedy: सामान्यतः हिवाळ्यात त्वचा आणि केस कोरडे पडतात, पण काही लोकांना या काळातही केस तेलकट होण्याची समस्या भेडसावते. थंड वारे, धूळ-माती, सतत कॅप/स्कार्फ वापरणे, डोक्यात घाम साचणे किंवा चुकीची हेअरकेअर रूटीन या सर्व कारणांमुळे स्काल्पमध्ये जास्त तेल साठते आणि केस पटकन जड व निस्तेज दिसू लागतात.
अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय आणि योग्य देखभाल केल्यास तेलकटपणा कमी होऊन केस पुन्हा मऊ, स्वच्छ आणि व्हॉल्यूम असलेले दिसू शकतात. जाणून घ्या हे प्रभावी उपाय,
१) लिंबू आणि गुलाबपाणी
लिंबामध्ये असलेले नैसर्गिक आम्लीय गुण स्काल्पवरील अतिरिक्त तेल, घाण आणि कोंड्याची परत सहज काढून टाकतात. गुलाबपाण्यातील थंडावा आणि सूज कमी करणारे गुण स्काल्पला शांत करतात.
कसा वापरायचा?
एका लिंबाचा रस एका कप गुलाबपाण्यात मिसळून शँपू केल्यानंतर शेवटच्या रिन्ससाठी वापरा. केस हलके, स्वच्छ आणि ऑयल-फ्री वाटतात.
२) आठवड्यात फक्त तीनदा शँपू
हिवाळ्यात वारंवार शँपू केल्यास स्काल्प कोरडा होतो आणि परत जास्त तेल तयार करतो. त्यामुळे तेलकटपणा वाढते.
उपाय:
आठवड्यात केवळ तीनदा सौम्य किंवा सल्फेट-फ्री शँपूचा वापर करा. यामुळे केस स्वच्छ राहतात आणि नेचरल ऑयलही संतुलित राहते.
३) अॅलोव्हेरा जेल
अॅलोव्हेरा हा स्काल्पसाठी नैसर्गिक क्लींजर आहे. तो अतिरिक्त सीबम काढतो, स्काल्प हायड्रेट ठेवतो आणि बॅक्टेरियाशी लढतो.
कसा वापरायचा?
आठवड्यात १–२ वेळा अॅलोव्हेरा जेल २० मिनिटे स्काल्पवर लावा आणि नंतर धुवा. केस हलके आणि कमी ऑयली वाटतील.
४) खूप गरम पाण्याचा वापर टाळा
अतिगरम पाणी स्काल्पचे नैसर्गिक तेल काढून टाकते. त्यामुळे स्काल्प पुन्हा जास्त तेल तयार करू लागतो आणि केस चिपचिपे होतात.
उपाय:
केस धुताना नेहमी कोमट किंवा हलकं थंड पाणी वापरा. यामुळे स्काल्प रिलॅक्स राहतो आणि ऑयल कंट्रोलमध्ये राहते.
५) कॅप/हुड वापरताना स्काल्पला हवा लागू द्या
हिवाळ्यात कपाळ व डोकं झाकून ठेवल्यास डोक्यात घाम अडकतो, ज्यामुळे तेल व घाण वाढते.
उपाय:
कॅप किंवा हुड घालत असाल तर मध्येच काढून स्काल्पला हवा लागू द्या. किंवा श्वास घेणाऱ्या (breathable) फॅब्रिकची टोपी वापरा.
या सर्व टिपा सामान्य माहितीवर आधारित आहेत. त्वचा किंवा केसांच्या गंभीर समस्यांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.





