ढोकसांगवीच्या ग्रामसभेला पदाधिकाऱ्यांची दांडी

रांजणगाव गणपती – ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा सदस्यांची गैरहजरी व नागरिकांची अनुपस्थिती असल्यामुळे तहकूब करावी लागली.

महत्त्वपूर्ण ग्रामसभेत 100 टक्‍के करवसुली, शासकीय योजनांसाठी लाभार्थी निवड, शासनाकडून परिपत्रके वाचणे आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, उपसरपंचांसह 8 सदस्य गैरहजर असल्याने ग्रामसभा तहकूब करावी लागली आहे.

ग्रामसभेकरिता सर्व ग्रामपंचायत सदस्य, शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी प्रतिनिधीक स्वरुपात हजर राहणे अपेक्षित आहे. मात्र, ग्रामसभेसाठी अंगणवाडी सेविका सोडून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविली.

ग्रामसभेला सरपंच शोभा शेलार, सचिव म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक रामदास पवार यांसह ग्रामपंचायत कर्मचारी आणि काही निवडक ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामसभा तहकूब झाल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. पुन्हा लवकरात लवकर ग्रामसभा घेण्याची मागणी प्रियंका जगताप यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.