चिकन विकणार्या तिघांवर गुन्हा
Updated On:

सातारा : दुकानात कोंबड्या कापून विकत जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनिल भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
आंदेकर चौक, करंजे नाका येथील स्टार चिकन सेंटर समोर लोक जमल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी अमीर शब्बीर शेख (रा. तामजाईनगर), सिंकदर महमंद शेख (रा. मंगळवार पेठ, सातारा), सोहेल महमंद शेख (रा. शाहूपुरी) हे संचारबंदी असतानाही स्टार चिकन सेंटर येथे चिकन विक्री करत असल्याचे दिसून आले. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून विक्री केली जात नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.





