प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह उपनगरात बुधवारी दिवसभर आकाश निरभ्र आणि ऊन पडले होते. महिन्याच्या पहिल्याच दिवशी उन्हाच्या चटक्याने ऑक्टोबर हीटची चाहूल लागली. पहिल्याच दिवशी दापोडीत सर्वाधिक ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अन्य परिसरात २९ ते ३२ अंश सेल्सिअस नोंद झाली.शहरासह जिल्ह्यात गेले आठ दिवस धो-धो पावसाने नद्या-नाल्यांना पूर आले, परिणामी जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर ओसरला आणि हवामानात बदल झाला. बुधवारी सकाळपासून आकाश निरभ्र आणि सुर्यनारायणाने दर्शन दिल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला. दिवसभराच्या उन्हामुळे हलका चटका जाणवू लागला.पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यत: ढगाळ राहील, तर हलक्या ते अति हलका पावसाच्या सरी पडतील. दिवसाचे कमाल तापमान.. दापोडी ३३, तळेगांव दाभाडे ३२, शिरूर ३०.५, मगरपट्टा ३०.१, कोरेगांव पार्क २९.८, वडगांवशेरी २९.२, पाषाण २८.८, शिवाजीनगर २८.७, हवेली २८,