#NZWvINDW 3rd ODI : महिला संघाचा सलग तिसरा पराभव
Updated On:

क्विन्सटाऊन – भारताच्या महिला क्रिकेट संघाला यजमान न्यूझीलंडकडून एकदिवसीय पाच सामन्यांच्या मालिकेत सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाने ही मालिका गमावली असून या मालिकेतील दोन सामने अद्याप बाकी आहेत.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शबनेनी मेघना, शेफाली वर्मा व दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 279 धावा उभारल्या होत्या.
न्यूझीलंडच्या अमेलिया केर, ऍमी सॅथरव्हाइट व लॉरेन डॉऊनने अर्धशतके फटकावली व 7 गडी गमावून 280 धावा करत संघाचा विजय साकार केला. डॉऊनने नाबाद 64 धावांची खेळी केली. याही सामन्यात भारतीय संघाला स्टार खेळाडू स्मृती मानधनाची उणीव जाणवली.





