Actress Nusrat Bharucha : अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या अनोख्या स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असते. आपल्या चाहत्यांंच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियावर तिच्या संबंधित अपडेट वेळोवेळी देत असते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. नुकतीच नुसरने काही फोटो तिच्या इन्स्टावरून शेअर केल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नुसरतला एका पार्टीत दुखापत झाली आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून याबाबत तिने स्वतः फोटो शेअर करत माहिती दिली. अभिनेत्री नुसरत भरुचाने तिची मैत्रीण इशिता राजच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. जिथे तिने खूप मजा केली, पण हिच मजा तिच्यासाठी दुखापतीचे कारण ठरली. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या हातावर खोल ओरखडे आणि जखमा असल्याचे दिसत आहे. एका फोटोमध्ये तिने जखम जवळून दाखवली आहे, ज्यामध्ये रक्तही बाहेर येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यासोबतच तिने फिल्टरवर ‘आउच’ आणि पट्टीचे स्टिकर्स देखील लावले आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये, नुसरत जखमी भाग दाखवण्यासाठी हात वर करत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर वेदनादायक भाव उमटल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे, ‘काही पार्ट्या तुमच्या आरोग्यासाठी खरोखर हानिकारक असतात!’ पार्टी दरम्यान पडल्याने किंवा तीक्ष्ण वस्तूला आदळल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. हेही वाचा : बिहारमध्ये निवडणुकांपूर्वी नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; १०० युनिट वीज मोफत देणार?