ठाकरे सरकारमध्ये “नुरा कुस्ती’ – फडणवीस

मुंबई – शरद पवार यांची मुलाखत मुलाखत म्हणजे नुरा कुस्ती आहे. अजून एक दिवस बाकी आहे. तो दिवस झाला की मी त्यावर प्रतिक्रिया देईन, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. तसेच ठाकरे सरकारच्या वतीनेच सरकार पाडण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. कोणीही सरकार पाडत नाही. ते आपणच कांगावा करून सरकार पाडत आहेत, असं वातावरण तयार करत आहेत. स्वतःच्याच मुलाखती घेत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, एकीकडे करोनाचे ऍक्टिव्ह केसेस वाढत आहेत. त्या सोबत मृतांचा आकडा वाढत आहे. हा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. आतापर्यंत देशात जेवढे करोनामुळे मृत्यू झालेले आहेत, त्याच्या 46 टक्के एवढे मृत्यू हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात “अन रजिस्टर डेथ’ आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
नया है वह…
देवेंद्र फडणवीस हे राज्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “नया है वह’. मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येते, पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतच असे नाही.




