ठाणे- स्टार प्रवाहवरील मालिका आई कुठे काय करते मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला मिळत असलेला प्रतिसाद वाखणण्याजोगा आहे. प्रत्येक पात्र आपलंसं करणारं असल्याने प्रेक्षकांमध्येही मालिकेची चर्चा चांगलीच रंगत असल्याचंं चित्र आहे.
हीच लोकप्रिय मालिका TRPमध्येसुद्धा अग्रेसर आहे. मागील आठवड्याच्या आकड्यानुसार मालिकेचं TRP रॅंकिंग 5.9 होतं. मालिका सध्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. मागील आठवड्यात या मालिकेत अनेक खुलासे होणार होते. हेच पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांनी आवर्जुन ही मालिका पाहिल्याचं समजतं.
अरुंधती, अनिरुद्ध, यश, निशा, संजना आणि गौरी या मालिकेतील प्रेक्षकांचे आवडते पात्र आहे. सोशल मीडियावर हे सतत अॅक्टीव असतात. चाहत्यांबरोबर संपर्कात असल्याने लोकप्रियताच वाढत नाही तर आपल्या तृटीसुद्धा समजतात, असं या सगळ्या कलाकारांचं म्हणणं आहे.
दोन दिवसापुर्वी मालिकेतील इशा घरातून निघून जाते, त्यानंतरचा सगळा भाग इशाच्या वर्तुळात फिरतो. याचमुळे स्टार प्रवाहच्या इंस्टाग्रामवर मालिकेतील कलाकार लाईव्ह आले होते त्यात त्यांनी चाहत्यांबरोबर मनमुराद गप्पा केल्या.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram