गुवाहाटीत बंडखोर आमदारांच्या विरोधात एनएसयुआय, राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
Updated On:

गुवाहाटी – शिवसेनेतील बंडखोर आमदारांना गुवाहाटीतील ज्या रॅडिसन ईन हॉटेलात ठेवण्यात आले आहे, त्या हॉटेलच्या बाहेर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व एनएसयुआय या कॉंग्रेसच्या विद्यार्थी शाखेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाची पोस्टरबाजी केली आहे.
हॉटेल परिसरात मोठा बंदोबस्त आसाम सरकारने तैनात केला असला तरी हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यांवरच ही पोस्टरबाजी करणत आली आहे. या आमदारांना उद्देशून शिवसेना के गद्दार असा शब्दप्रयोगही या पोस्टरवर दिसतो आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सांगितले की आमच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टर लावली असतील तर ते योग्यच आहे. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करून राज्यातील जनतेला धोका देणाऱ्या या बंडखोर आमदारांना गुवाहाटीपासून मुंबईपर्यंत सर्वत्र असाच विरोधाचा सामना करावा लागणार आहे.





