Viral video : आता काय खरं नाही…! सैयारा पाहण्यासाठी तरुणाचा वेडेपणा; काय केलं तुम्हीच पाहा….

Viral video : सध्या बॅाक्स अॅाफिसवर सैयारा चित्रपटाची मोठी क्रेज आहे. आठवड्याभरातच या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रिकार्ड मोडत नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटातील अहान पांडे आणि अनित पद्ढा यांच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडीओ पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचवाल्या आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत चक्क एक तरुण सैयारा हा चित्रपट पाहण्यासाठी आयव्ही ड्रिप घेऊन थिएटरमध्ये पोहचला असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया केल्या आहेत. त्यातील एक कमेंट सलाइन लावले असताना याला डॉक्टरांनी बाहेर सोडलेच कसे? असा प्रश्न केला आहे.
व्हायरल व्हिडीओत काय?
एक तरुण त्याच्या हातात आयव्ही ड्रेप लावलेला दिसत आहे. अशा अवस्थेत तो सैयारा हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात आल्याचे दिसत आहे. चित्रपटातील एक सीन पाहताना तरुण भावनिक झाल अन् त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू तो पुसताना दिसत आहे. तसेच आणखी एका व्हिडीओमध्ये हा तरुण आयव्ही ड्रिप घेऊन चक्क रस्त्यावर चालताना दिसत आहे.
या व्हिडीओवर भरभरून कमेंटस आल्या आहेत. “बाटली वर धरा भाई, ग्लुकोज काम करत नाहीये.” “डॉक्टरांनी सांगितले आहे का की चित्रपट पाहिल्यानंतर तू पूर्णपणे बरा होशील.” याला डॉक्टरांनी बाहेर सोडलेच कसे? अशा प्रकारच्या कमेंटस करण्यात आल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सैयाराने आत्तापर्यंत किती कमाई केली?
खरंतर रिलीज झाल्यापासून सैयारा हा चित्रपट अक्षरशाः धूमाकूळ घालत आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी याने केले आहे. रिलीज झाल्यापासून आत्तापर्यंत या चित्रपटाने तब्बल 105.75 कोटींची कमाई केली आहे.
हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’नंतर निलेश साबळेची स्टार प्रवाहवरील शोमध्ये धमाकेदार एन्ट्री





