आता आमच्याकडूनही राजकीय खेळ्या होतील; संजय राऊतांचा गर्भित इशारा

मुंबई – केंद्रीय यंत्रणांचा राजकीयदृष्ट्या गैरवापर करून भाजपकडून सध्या राजकीय खेळ्या केल्या जात आहेत. पण त्या पार्श्वभूमीवर आता आम्हीही काही राजकीय खेळ्या करू असा सूचक इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
आज येथे ते पत्रकारांशी बोलत होत. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने केंद्रीतील सत्तेचा राजकीय कारणासाठी दुरूपयोग चालवला आहे. याच भूमिकेतून त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या मंत्र्याला अटक केली असून त्यावरून आता भाजपने संबंधीत मंत्री, नवाब मलिक यांचा राजीनामाहीं मागितला आहे.
त्यासाठी भाजपकडून आंदोलनही सुरू आहे. पण कोणत्या मंत्र्याला कायम ठेवायचे आणि कोणाचा राजीनामा घ्यायचा हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. त्यासाठी त्यांच्यावर कोणाला दबाव आणता येणार नाही. भाजपच्या या खेळ्या राजकीय हेतूने प्रेरीत असल्याने आता आम्हालाही तशीच कृती करावी लागेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.





