बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमूने गतवर्षी “अभय’ वेबसिरीजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर धडाक्यात एन्ट्री केली होती. वेबसिरीजच्या पहिल्या भागाला चांगले यश मिळाल्यानंतर दुसरा भाग नुकताच ऑगस्टमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याला चाहत्यांकडून पहिल्या सीजनपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता या सिरीजच्या तिसऱ्या भागाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. “झी-5’च्या या सिरीजमध्ये कुणाल खेमूने इंवेस्टिगेशन ऑफिसर अभय प्रताप सिंहची भूमिका साकारली आहे.
पहिल्या सीजनमध्ये अभयने लखनौमधील चिंथारी या गावातील रघू आणि पूजा या दोन बेपत्ता मुलांचा जीव वाचविला होता. यात अभयला किडनॅपर्ससह आपल्यातील शैतानाचीही सामना करावा लागला होता. तसेच दुसऱ्या सीजनची कथा आणखीच रहस्यमय होती. यात अभयला एका खूंखार क्रिमिनलचा (राम कपूर) सामना करावा लागतो. दुसरा सीजन समाप्त होताच चाहत्यांना तिसऱ्या सीजनची उत्सुकता लागली होती.
आता चाहत्यांना लवकरच हा तिसरा सीजन पाहावयास मिळणार आहे. प्रसिद्ध डायरेक्टर केन घोषद्वारा दिग्दर्शित या सिरीजच्या पहिल्या सीजनमध्ये कुणाल खेमूसह दीपक तिजोरी आणि रितुराज सिंह यांनी काम केले होते. तर दुसऱ्या सीजनमध्ये राम कपूर, चंकी पांडे, बिदिता बेग, आशा नेगी, राधव जुयल, निधि सिंह आणि शान कक्कर झळकले होते.