फलटण, ( प्रतिनिधी) – 1827 पासून परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता,नाविन्यता या पंचसूत्रांवर आधारित विश्वास संपादन केलेली व संपूर्ण महाराष्ट्रात 198 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली चंदुकाका सराफ ही सुवर्णपेढी आता फलटणकरांच्या सेवेसाठी आली आहे. आता चंदुकाका सराफ यांच्यामुळे फलटणकरांना मिळणार बारामतीचे शुध्द सोने असे उद्गार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काढले. चंदुकाका सराफ यांच्या फलटण येथील शिंगणापूर रोडवरील अहिल्यादेवी होळकर चौक येथील भव्यदिव्य शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माजी नगराध्यक्ष दिलीप सिंह भोसले, उद्योजक विजयराव बोरावके, माजी नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, सौ. ॲड मधुमाला भोसले, क्रेडाईचे अध्यक्ष अनिल निंबाळकर, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष किरण दंडिले, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सुनील महाडीक, प्रवीण निंबाळकर, चंदुकाका सराफचे चेअरमन श्री किशोरकुमार शहा, संचालिका सौ. नेहा किशोरकुमार शहा, संचालक सम्यक किशोरकुमार शहा, श्रीमती वंदना सतिशचंद्र कोठारी, सौ. अजिता सतिश शहा , आनंदी जिनदत्त शहा, निकेत फडे, शितल पाटील, अनुप्रिता फडे, डॉ. प्रियांका कुंभोजकर, डॉ. अनिकेत कुंभोजकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. बजेटमध्ये सोन्यावरील कस्टम ड्यूटी कमी झाल्याने सोन्याचेदर कमी झाले असून ग्राहकांना सोने खरेदीमध्ये आत्ता मोठी बचत होणार आहे. या सुवर्णसंधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा यांनी यावेळी केले. शुभारंभानिमित्त दि. २८ जुलै ते १ ऑगस्ट ह्या पाच दिवसांच्या कालावधीत शुभारंभ ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये रू. २०,००० पासून पुढील खरेदीवर दररोज १ ज्युपिटर गाडी आणि रू. ३,००० व पुढील गुंतवणूकीवर फक्त १ ज्युपिटर गाडी जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करण्यात आली आहे. शुभारंभाच्या ह्या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी तसेच त्या निमित्ताने आयोजित केलेल्या अनेक आकर्षक योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देत आहोत, त्याचा स्वीकार करून आवर्जून भेट द्या आणि आपल्या आवडीचे दागिने खरेदी करा, असे आवाहन फलटणवासियांना चंदुकाका सराफ चे चेअरमन किशोरकुमार जिनदत्त शहा व संचालक श्री. सम्यक किशोरकुमार शहा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 1800 267 8555 ह्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.