सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे, पण सलमान खान एकामागून एक आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत आहे. पहिल्या लॉकडाऊनदरम्यान तो त्याच्या फार्महाऊसमध्ये अडकला होता. जिथून त्याने दोन गाणी रिलीज केली आणि आपल्या गाण्यातील प्रतिभा दाखवून दिली. तसेच लॉकडाऊनमध्येच तो आपले ग्रूमिंग प्रोडक्टस् आणण्याच्या तयारीत होता, ज्याअंतर्गत तो डियोड्रेंट लॉंच करणार होता; परंतु करोनाच्या सद्यपरिस्थितीमुळे सलमान खानने हॅंड सॅनिटायझर लॉंच केले आहे.
सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याची घोषणा करत लिहिले की, “मी माझे नवीन ग्रूमिंग आणि पर्सनल केअर ब्रॅंड फ्रेश लॉंच करत आहे. हा आहे आपला, माझा आणि सर्वांचा ब्रॅंड, जो आपल्यासाठी देईल सर्वोत्तम उत्पादने. सॅनिटायझर्स आले आहेत, जे येथे तुम्हाला भेटेल…मग वापरून पहा.’ अशाप्रकारे सलमान खानने सध्या परिस्थिती सांगत बाजारात मागणी असलेल्या सॅनिटायझरचे उत्पादन बाजारात आणले आहे. जे येणाऱ्या काळात खूप महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सलमान खानचा “राधे’ चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज होणार होता; परंतु करोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने सर्व ठप्प झाले आहे.